कर्वेनगरच्या उड्डाणपुलाखाली मद्यपींचा अड्डा

संग्रहित छायाचित्र......

शाळेजवळील स्थिती : सायंकाळी घोळका

कर्वेनगर – कर्वेनगर चौकातील नवीन उड्डाणपुलाच्या खालचा भाग आता मद्यपींसाठी चांगलाच अड्डा झाला असून सायंकाळनंतर उड्डाणपुलाच्या एका बाजूच्या पीलरजवळ मद्यपींचा घोळका दारु पीत बसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या तळीरामांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई का होत नाही, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्वेनगर चौकातील उड्डाणपुलाखालील जागा आता मद्यपींसाठी चांगला आसरा झाला असून सायंकाळ झाली की एक एक मद्यपी या ठिकाणी जमा होत असतो.
कर्वे शाळेच्यासमोरच्या बाजूला असणाऱ्या पीलरच्या कडेने असलेल्या कठड्यावर दारूच्या बाटल्या ठेवून प्लॅस्टीक थर्मोकॉलचे ग्लासमधून दारू पिण्याचा कार्यक्रम चांगलाच रंगत असल्याचे पाहिला मिळत आहे. पुलाखालीच मासे बनविणाऱ्याची गाडी लागत असते. त्याच्याकडून खाण्यासाठी मासे ही मागवले जातात. चायनीज हॉटेल असल्याने या मद्यपींची पुलाखाली चांगलीच सोय झाली आहे. सकाळी पुलाच्या या पीलरजवळ बाटल्यांचा खच पडलेला पाहिला मिळतो. राजरोसपणे हा प्रकार चालू असताना कोणीच कारवाई करत नसल्याने या मद्यपींचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही दिवसात पुलाखाली दारुड्यांची जत्रा भरल्याशिवाय राहणार नाही, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस व पालिका प्रशासनाकडून याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधींनी हा प्रकार थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. उड्डाणपुलाच्या खालची जागा मद्यपींचा अड्डा बनून राहू नये व पुलाखाली स्वच्छता राखली जावी, यासाठी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)