कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर

पिंपरी – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपलब्ध मनुष्यबळाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एकूण 7 हजार 982 कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्यात आल आहे. त्यामध्ये 3 हजार 816 अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. त्यामध्ये 156 अपंग आणि 14 सेवा निलंबित कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पुणे महानगरपालिकेने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते. याशिवाय पिंपरी,चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनीदेखील लोकसभा निवडणुकीकरिता कर्मचारी पुरविण्याची स्वतंत्र मागणी केल्याने या गोंधळात आणखी भर पडली होती.
या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशामहापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना आपल्या विभागातून उपलब्ध होणाऱ्या मुनष्यबळाची यादी प्रशासन विभागाला सादर केली. त्यानुसार ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेला सादर करण्यात आलीसनाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करत, यावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यावर दोन दिवस वाट पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या मनुष्यबळाची माहिती एकत्रित संकलीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर कार्यवाही करत, आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)