कर्नाटक विधानसभा; मतदान करणे माझा लोकशाही हक्क – विजय मल्ल्या

नवी दिल्ली : देशातील बँकांना कोट्यवधीचा गंडा घालून देश सोडून पळून गेलेल्या उद्योगपती  विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण अर्जावर लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सीबीआयने सादर केलेले सर्व पुरावे दाखल करुन घेतले आहेत. ११ जुलैला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान सुनावणीनंतर बोलताना विजय मल्ल्याला कर्नाटक निवडणुकीसंबंधी विचारण्यात आले तेव्हा, हा माझा लोकशाही हक्क आहे पण माझ्या जामीनासाठी अशा काही अटी आहेत की मी ब्रिटन सोडून जाऊ शकत नाही असे म्हटले आहे.

‘हो कर्नाटक निवडणुकीत मतदान करणे माझा लोकशाही हक्क आहे, पण जामीन मिळण्यासाठी अशा काही अटी आहेत की मी ब्रिटन सोडू शकत नाही. मी सध्या राजकारणाची कोणतीही माहिती ठेवत नसल्याने त्याबद्दल बोलणार नाही’, असे विजय मल्ल्या म्हणाला आहे. सुनावणीसाठी विजय मल्ल्या स्वत: न्यायालयात हजर होता. यावेळी न्यायाधीशांनी भारतीय प्रशासनाने दाखल केलेले सर्व पुरावे स्वीकार्य असल्याचे सांगितल्याने मल्ल्याला चांगलाच धक्का बसला. दरम्यान, विजय मल्ल्याने भारतीय बँकांची फसवणूक केली असून त्याला वॉण्टेड घोषित करण्यात आले आहे. स्कॉटलंड यार्डने गेल्या एप्रिल महिन्यात त्याला अटक केली होती. मात्र लगेचच जामीनावर त्याची सुटका करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील बातमी पत्र वाचले विजय माळ्याने नुकतेच नवीन लग्न केल्याचे वाचण्यात आले त्याच्या ह्या लग्नाला भारतातून किती महत्वाच्या व्यक्तींना त्याने आमंत्रण अथवा निमंत्रण दिले होते व त्या पैकी किती जणांनी हजेरी लावली व जे व्हीआयपी हजेरी लावू शकले नाहीत त्यांच्यावर कोणती बंधने होती व ती कोणी लावली होती ह्याची माहिती विजय मळ्याला नक्कीच असावी ती त्याने का जाहीर करू नये हा महत्वाचा प्रश्न एकाही वार्ताहराने विचारू नये हे आस्चर्य नव्हे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)