कर्नाटकात सापडली टिपु सुलतान यांच्या काळातील एक हजार रॉकेट्‌स

बंगळुरू – कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील एका जुन्या किल्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननाच्यावेळी टिपु सुलतानाच्या काळातील एक हजार रॉकेट्‌स सापडली आहेत. शिवमोगा जवळील नगरा येथील एका जुन्या किल्ल्याच्या बुजलेल्या विहीरीच्या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात हा खजिना सापडला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखेखालीच हे उत्खनन करण्यात येत होते.

याच भागात सन 2002 साली न वापरलेली 160 रॉकेट्‌स सापडली होती. त्या रॉकेट्‌सचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर ती टिपु सुलतानच्या काळातील असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अशीच काही रॉकेट्‌स या भागात असण्याची शक्‍यता वर्तवण्यात आल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे हे उत्खनन सुरू केले होते त्यावेळी त्यांना ही एक हजार न वापरलेली रॉकेटस सापडली. ती तेथे त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी लपवून ठेवली होती व तो साठा तसाच राहीला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रॉकेटमध्ये मॅग्नेशियम,आणि पोटॅशियम नायट्रेटचे रसायन सापडले आहे. या पैकी काही रॉकेट्‌स म्हैसुर मधील वडियार राजवटीच्या काळातीलही असावीत असा कयास आहे. ही रॉकेट्‌स कच्चा लोखंडाच्या धातुची आहेत. ती आता लोकांना पहाण्यासाठी प्रदर्शनाच्या स्वरूपात ठेवली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)