कर्नाटकात मानापमान नाट्य : संरक्षण मंत्र्यांचा राज्याच्या मंत्र्याशी वाद

माध्यमे, अधिकाऱ्यांसमोर सुनावले मंत्र्याला
बेंगळूरु – संरक्षण मंत्री निर्मला सितारामन कर्नाटकमधील पूरग्रस्त कोडागु जिल्ह्याच्या भेटीवर असताना अचानक वादाचा प्रसंग उद्‌भवला. कर्नाटकचे मंत्री सा रा महेश यांच्याशी सितारामन यांचा खटका उडला. सितारामन यांनी सुनावल्यानंतर राज्य सरकार हे केंद्रापेक्षा कनिष्ठ नाही अशा आविर्भावात राज्य मंत्र्यांनी वाद घालायला सुरुवात केली. कोडागु भेटीवर असताना मंत्री महेश यांनी आपल्यासाठी काटेकोर वेळापत्रकाचे नियोजन न केल्याबद्दल सितारामन यांनी नाराजी व्यक्‍त केली होती.

कोडागु जिल्ह्यातील सितारामन यांच्या भेटीच्या मार्गावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये मतभेद झाले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच प्रसिद्धी माध्यमे आणि अधिकाऱ्यांसमोरच ही शाब्दिक चकमक झाली. आज त्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने प्रवक्‍त्याकडून स्पष्टिकरण देण्यात आले आहे. कोडागु जिल्ह्याचे प्रभारी असलेल्या सा.रा.महेश यांनी सितारामन यांच्याविषयी काही वैयक्तिक शेरेबाजी केली. यामुळे त्यांच्या या शेऱ्यांमुळे राज्यसभेलाही कमीपणा आणला गेला. तसेच त्यांना जाणीवेचा पूर्ण अभाव आणि भारतीय राजकारणाची समजही नसल्याचे स्पष्ट दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्याबाबतचे वक्‍तव्य अभिरुचीहीन होते. त्याला कोणतीही प्रतिक्रिया दिली जाऊ शकत नाही, असे या स्पष्टकरणात म्हटले होते.

मात्र कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांनी मात्र याला प्रत्युत्तर दिले आहे. राज्यसरकारला मिळालेले अधिकार राज्यघटनेकडून मिळालेले आहेत, केंद्र सरकारकडून मिळालेले नाहीत. राज्यघटनेनेच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांचे वाटप केले आहे. आम्ही सितारामन यांचे भागीदार आहोत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कर्नाटकातील पूरस्थितीची पहाणी आणि जिल्हा प्रशासनाच्या कामासाठी राज्यातील मंत्री बेऱ्च दिवस कोडागु जिल्ह्यातच राहिले आहेत. तुम्हाला त्यांच्याकडून जेवढा मान दिला जातो, तेवढाच तुम्हीही त्यांना मान द्यायला हवा. आपण माझ्या सहकाऱ्यावर ओरडलात हे निराशाजनक आहे, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)