कर्नाटकात भाजप सत्तेवर आल्यास राज्याला ‘भ्रष्टाचारमुक्त’ मॉडेल म्हणून विकसित करू – शहा

बंगळुरू – कर्नाटकात भाजप सत्तेवर आल्यास राज्याला ‘भ्रष्टाचारमुक्त’ मॉडेल म्हणून विकसित केले जाईल, असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ते बंगळुरू येथे व्यापारी व उद्योगसंबंधी संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे बोलताना  म्हणाले की, २०१४ पूर्वी देशाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आम्ही कामाची पद्धत बदलून टाकली.

शौचालयाविना घर नसावे, असे सरकारला वाटते.प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते असले पाहिजे. प्रत्येक गावात वीज असली पाहिजे. २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती सुमारे  १२ लाख कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली. भाजप सरकारच्या अथक परिश्रमामुळे गत चार वर्षांत २९ लाख लोकांची बँक खाती सुरू झाली आणि साडेसात लाख शौचालये तयार करण्यात आले . नऊ लाख कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्यात आला, असा दावा शहा यांनी यावेळी केला.

कोणतेही सरकार देशातील सर्व तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. परंतु २०१४ मध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनावरून मोदी सरकारवर सातत्याने टीका होत आली आहे. परंतु पंतप्रधानांनी स्वयंरोजगाराचे नवनवीन मार्ग खुले करून दिले आहेत. कोणत्याही तारणाविना तरुणांना १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत अनेक कल्याणकारी योजनांची चांगली अंमलबजावणी केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)