कर्तव्यापेक्षाही सेवा भावनेने हे काम करा -उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद 

नान्नज येथे शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसले यांचा सर्व पक्षीय सत्कार 
जामखेड : सत्ता हे सेवेचे साधन असून, त्याचा पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करून कर्तव्यापेक्षाही सेवा भावनेने काम करा असे प्रतिपादन उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज येथे नवनिर्वाचित  शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभाेसले यांचा सर्व पक्षीय सत्कार समारंभ आयाेजित केलेल्या कार्यक्रमात केले.

नवनिर्वाचित जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभाेसले यांचा सर्व पक्षीय सत्कार समारंभ नान्नज येथे आयाेजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद बोलत होते. यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख सचिनभाऊ मुळुक, युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चिंतामणी जगताप, काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब सांळुके, बीड भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, भाजपा गटप्रमुख संतोष पवार, बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे, धोंडपारगावचे चेअरमन राजेश जाधव, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संतोष वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन मलंगनेर, अॅड. अल्लाउद्दीन शेख, मराठा महासंघाचे अध्यक्ष दत्ता शिंदे, जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच बब्रुवान वाळुंजकर, पप्पू जगताप, अप्पा मोहळकर, दत्ता पाचारणे, राहुल उगले, प्रकाश रजपूत आबा साळुंके, सागर गवसणे यांच्यासह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सचिन मलंगनेर यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभाेसले यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद म्हणाले की,  प्रत्येकाने आपणास मिळालेल्या पदाचा वापर गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी करा. गेली अनेक वर्षापासुन शहाजी राजे राजकारणात  सक्रिय आहेत. त्यांना मिळालेले पद हे मोठे आहे.राजे यांनी सामन्यातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. असे सांगुन राजे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बीड जिल्हा प्रमुख सचिनभाऊ मुळुक, चिंतामणी जगताप, बाळासाहेब सांळुके, स्वप्नील गलधर, संतोष पवार, यांनी यावेळी  मनाेगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मलंगनेर यांनी केले तर आभार राहुल उगले यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)