करोना चाचणीचे धोरण केले व्यापक

The strategy for the Corona test is broad

नवी दिल्ली : करोनाची लक्षणे आढळणाऱ्या सर्व व्यक्तीची चाचणी आजारी पडल्यापासून सात दिवसांत घेण्याचे आदेश इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने शनिवारी दिले. ही व्यक्ती करोना बाधिताच्या संपर्कात आली असो अथवा नसो त्याची चाचणी करावी, असे आपल्या चाचणीच्या धोरणात केलेल्या विस्तारात स्पष्ट केले आहे.

नव्या धोरणानुसार खालील सहा प्रकारच्या संशयितांची आता चाचणी केली जाणार आहे.
1) गेल्या 14 दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या आणि लक्षणे दिसणाऱ्या व्यक्ती
2) चाचणीत बाधा झाल्याचे निष्पन्न झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या आणि लक्षणे आढळणारे संशयित
3) लक्षणे आढळणारे आरोग्य कर्मचारी
4) श्‍वसनाचे तीव्र विकार बळावलेल्या सर्व व्यक्ती ( ताप आणि खोकला तसेच अथवा श्‍वसनास अडथळा येणाऱ्या व्यक्ती)
5) करोनाबाधिताच्या पाचव्या ते 14 व्या दिवसांच्या काळात थेट आणि धोकादायक संपर्कात आलेल्या व्यक्‍ती.
6) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेले हॉटस्पॉट आणि मोठ्या संख्येने एकत्रित स्थलांतरीत अथवा सुटका केंद्रांमधील तापाच्या आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्ती (ताप, खोकला,घशात खवखव, सर्दी) यात पहिल्या सात दिवसांत आरटी-पीसीआर टेस्ट आणि सात दिवसांनंतर अँटीबॉडी टेस्ट (निगेटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर टेस्टने खात्री करावी)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.