करिष्मा शर्माशी धरमशालामध्ये गैरवर्तन

अभिनेत्रींबाबत अशा काही गोष्टी घडतात ज्याबाबत खुसखुशीत चर्चेपेक्षा चिंताच अधिक वाटायला लागले. करिष्मा शर्माच्या बाबतीतही असेच घडले आहे. धरमशाला इथे सुट्टीसाठी गेली असताना करिष्मा शर्माचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेली करिष्मा शर्मा चक्‍क सुट्टी अर्धवट सोडून मुंबईला निघून आली.

कामामुळे आलेला थकवा घालवण्यासाठी करिष्मा शर्माने काही दिवस धरमशाला इथे जाण्याचे ठरवले होते. धरमशाला हे निसर्ग सौंदर्याने नटलेले अतिशय सुंदर ठिकाण आहे. आणि आपल्या मित्राबरोबर तिथे गेलेल्या करिष्मा शर्माने धरमशालामधील एका मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी काही फोटोही काढले. तिथून निघताना त्यांच्या असे लक्षात आले की सुमारे 15 जण त्यांची वाट आडवून उभे होते. हे सगळे जण करिष्मा आणि तिच्या मित्राकडे रोखून बघत होते. त्यातल्या त्यात करिष्माकडे ते सगळे जण अगदी डोळे फाडून बघत उभे होते. त्या सगळ्यांची करिष्मा आणि तिच्या मित्राला भीती वाटली आणि या टोळक्‍याकडून काही इजा होण्यापूर्वी ते काहीही न बोलता तेथून सटकले. तेथून काही अंतरावर एक पोलीस त्यांना भेटला. त्याला ही सगळी हकिगत सांगितल्यावर त्या पोलिसाने काही मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टाच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा प्रकार इथेच थांबला नाही. बाजारपेठेत शॉपिंग करताना काही जण आपला पाठलाग करत असल्याचे करिष्माच्या ध्यानात आले. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी ती एका दुकानात घुसली. पाठलाग करणाऱ्यांच्या हातात काही धारधार शस्त्र असल्याचाही तिला भास झाला. आपले अपहरण करण्याचा यांचा इरादा असावा, असे करिष्माने मनोमन ओळखले.
दुसऱ्या दिवशीही तसाच अनुभव आला. आपल्याला उद्देशून काही लोक गाणी म्हणत असल्याचे तिला जाणवले. ही गाणी केवळ खुणेसाठी होती, हे तिने ओळखले. प्रत्येक गल्लीत फिरताना तिला असाच अनुभव आला.

धरमशालामध्ये 4 दिवस राहण्याच्या इराद्याने आलेल्या करिष्मा शर्माला दोनच दिवसात तेथून काढता पाय घ्यावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)