करिअर साप्ताहिकी…

पवनहंस लि. मध्ये विमानचालकांच्या 10 जागा : अर्जदारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, गणित व इंग्रजी विषयांसह व 60% गुण मिळवून उत्तीर्ण केली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असावेत. वयोमर्यादा 25 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली पवनहंस लि.ची जाहिरात पहावी अथवा पवनहंसच्या www.pawanhans.co.in या संकेतस्थलाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2018.

एअरपोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियामध्ये कार्यालयीन सहाय्यकांच्या 4 जागा : 
अर्जदार पदवीधर व टंकलेखनाची 40 शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत आणि त्यांना संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा 40 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 14 ते 20 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली एअरपोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा एअरपोर्टस ऍथॉरिटीच्या www.aaiaero. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2018.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे असिस्टंट रजिस्ट्रार-प्रशासनच्या 10 जागा : 
अर्जदार पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना प्रशासनिक कामाचा 8 वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा 45 वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरची जाहिरात पहावी अथवा आयआयएसच्या https://iisc.ac.in/positoons-open/fill-in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2018.

दि न्यू इंडिया ऍशोरंस कंपनीमध्ये सहाय्यकांच्या 685 जागा : 
अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना प्रादेशिक भाषांचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा 30 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली दि न्यू इंडिया ऍशोरंस कंपनीची जाहिरात पहावी अथवा कंपनीच्या http://newindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2018.

भारतीय तटरक्षकदलात विविध संधी : अर्जदारांनी इलेक्‍ट्रिकल मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदविका पात्रता कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा 22 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय तटरक्षकदलाची जाहिरात पहावी अथवा तटरक्षकदलाच्या http://joinindianucoastguard.gov.in/reprint.aspx या संकेतस्थळा भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2018.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मुंबई येथे क्रीडा अधिकाऱ्यांच्या 4 जागा :
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीची जाहिरात पहावी अथवा आयआयटीच्या http://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2018.

डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, दिल्ली येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या 10 जागा : अर्जदारांनी इंजिनिअरिंगमधील पदवी व नेट, गेट यासारखी पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी इंजिनिअरिंग वा गणितातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्‍यक. वयोमर्यादा 28 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 30 जून -6 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, दिल्लीची जाहिरात पहावी.
तपशिलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- पब्लिक इन्फरमेशन ऑफिसर, डिफेंस रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, साइंटिफिक ऍनलिसिस ग्रुप, मेटॅकॅफ हाऊस, नवी दिल्ली- 110054 येथे 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9.30 वा.

आर्मड फोर्सेस मेडिकल स्टोर्स, पुणे येथे कनिष्ठ कारकुनांच्या 2 जागा :
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची संगणकीय पद्धतीने 35 शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची 30 शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 27 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 14 ते 20 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली आर्मड फोर्सेस मेडिकल स्टोर्स, पुणेची जाहिरात पहावी.
तपशिलावर अर्ज कमांडिंग ऑफिसर, ऑर्मड फोर्सेस मेडिकल स्टोर्स डेपो, 20, फिल्डमार्शल मोनेक्‍शा रोड, पुणे- 411001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2018.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट फायर सर्व्हिसच्या 119 जागा : अर्जदार मेकॅनिकल, ऑटोमोबाईल वा फायर सर्व्हिसेसमधील पदविका परीक्षा कमीतकमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा 30 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 14 ते 20 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जाहिरात पहावी अथवा प्राधिकरणाच्या iie.www.sai.aero अथवा https://www.aai.aers/careers/recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2018.

कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी : 
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली कृषी विज्ञान केंद्र, अकोलाची जाहिरात पहावी अथवा www.kukaleda.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2018.
– दत्तात्रय आंबुलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)