करिअर साप्ताहिकी

दत्तात्रय आंबुलकर

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सच्या 10 जागा – उमेदवारांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 33 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 12 ते 18 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा पॉवर ग्रीडच्या www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2018.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जहाज वाहतूक मंत्रालयात असिस्टंट एक्‍झिक्‍युटिव्ह इंजिनिअर्सच्या 6 जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 12 ते 18 मे 2018 चया अंकात प्रकाशित झालेली केंद्रिय जहाजवाहतूक मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic,in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2018.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये वरिष्ठ कायदा अधिकारी म्हणून संधी – उमेदवार कायदा विषयातील पदवीधर असावेत व त्यांना कंपनी कायदा क्षेत्रातील कामाचा 7 वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा 35 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 5 ते 11 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सची जाहिरात पहावी अथवा आरसीएफच्या www.rcfttd.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज एक्‍झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., पहिला मजला, रुम नं. 148, प्रियदर्शनी, चेंबूर, मुंबई- 400074 या पत्त्यावर पाठण्यिाची शेवटची तारीख 31 मे 2018.

सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे अंतर्गत करारतत्त्वावर कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता (स्थापत्य) च्या 9 जागा 
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सार्वजनिक बांधकाम मंडळाची जाहिरात पहावी अथवा मंडळाच्या www.mahapwd.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.संपूर्णपणे भरलेले अर्ज अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे 411001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 31 मे 2018.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, मुंबई येथे टेक्‍निकल सुपरिंटेंडेंटच्या 3 जागा
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची जाहिरात पहावी अथवा आयआयटीच्या http://www.iitb.in/eu/careers/staff-recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2018.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये संशोधकांच्या 22 जागा अर्जदारांनी इलेक्‍ट्रॉनिक वा कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा 28 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 12 ते 18 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची जाहिरात पहावी अथवा डीआरडीओच्या https://rac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2018.

अणुशक्ती विभागात मुंबई येथे वरिष्ठ कारकुनीांच्या 6 जागा – अर्जदारांनी पदवी परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते इंग्रजी टंकलेखनाचे 30 शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा 30 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 5 ते 11 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली अनुशक्ती विभागाची जाहिरात पहावी अथवा www.dcscm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2018.

इंडियन काउंसिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चमध्ये कनिष्ठ कारकुनांच्या 12 जागा –  अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 12 ते 18 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन काउंसिल ऑफ सोशल सायन्ससेसची जाहिरात पहावी अथवा काउंसिलच्या www.icssr.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2018.

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे संशोधन अधिकारी म्हणून संधी – अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 12 ते 18 मे 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची जाहिरात पहावी अथवा टीआयएफआरच्या http://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2018.

नॅशनल इन्व्हेस्टीगेटिव्ह एजन्सीमध्ये सिनिअर पब्लिक प्रॉसिक्‍युटरच्या 8 जागा – अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्व्हेस्टीगेटिव्ह एजन्सीची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एसपी (ऍडमिनिस्ट्रेशन), नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (मुख्यालय), सीजीओ कॉम्प्लेक्‍ससमोर, नवी दिल्ली 110003 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 5 जून 2018.

इंडो-तिबेटन सीमा पोलीसदलात असिस्टंट कमांडंटच्या 35 जागा – अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 7 ते 13 एप्रिल 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीसदलाची जाहिरात पहावी अथवा आयटीबीपीएफच्या http://itbpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी इन्स्पेक्‍टर जनरल (पर्सोनेल), डायरेक्‍टोरेट जनरल, इंडो-तिबेटन बॉर्डर, सिक्‍युरिटी फोर्स, ब्लॉक-2, सीजीओ कॉम्प्लेक्‍स, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 5 जून 2018.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)