करिअरचे नियोजन करताना…

जगदीश काळे

योग्य करिअर निवडण्यासाठी प्रत्येक तरुण व्यक्तीला मिळतो मात्र आपल्या व्यक्तिमत्वानुरूप योग्य निर्णय घेण्याची समज मात्र नक्कीच असली पाहिजे. त्याची तयारी लहानपणापासूनच केली पाहिजे. आपल्या शैक्षणिक विषयांची निवड करतो तेव्हाच ही सुरुवात होते. याबाबतीत घेतलेला चुकीचा निर्णयाचा फटका मात्र संपूर्ण आयुष्याला बसू शकतो.

संधी ओखळायला शिका
आयुष्य चुकीचे निर्णय बदलण्याची संधी काही वेळा देऊ करते पण ती संधी ओळखू शकलो तर मात्र आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाऊ शकते. प्रश्‍न हाच की ही संधी ओळखायची कशी. त्यासाठी करिअर समुपदेशकांची मदत घेता येते. कारण करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा कोणती तसेच संधी कोणत्या याची माहिती ते देऊ शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मित्रांचा परिणाम-
काही वर्षांपूर्वी “लक्ष्य’ या चित्रपटात हृतिक रोशन त्यांचे मित्र जे काही करतात तेच करण्याच्या मागे असतो. आपल्यापैकी अनेक लोक असेच वागतात. मित्राने जे विषय घेतले तेच निवडतो, ते जे शिकतात तेच आपणही शिकूया असाच कल असतो. अनेक वर्षांनंतर असे लक्षात येते की आपण निवडलेले क्षेत्र आपल्यासाठी नाहीच. आपण एखादी वस्तू किंवा कपडे खरेदी करण्यासाठी पसंतीचा विचार करत चार दुकाने फिरत असू आणि घेतलेला ड्रेस फक्त वर्षभर वापरून टाकून देतो पण तसाच सेम ड्रेस मित्रांजवळ असता कामा नये ही देखील अपेक्षा असते. मग करिअरच्या मार्गाचा विचार करताना जे आयुष्याचा मार्ग ठरवणार असते त्याबाबतीत मात्र मेंढरांच्या मानसिकतेने काय जातो. करिअर तर आपल्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे असते.

विश्‍लेषण गरजेचे
आपल्या ताकद, छंद आणि आवड यांचे विश्‍लेषण करावे आणि समाजात विशेष व्यक्ती म्हणून नाव कमवावे. सतत करिअर बदलत राहात आपले लक्ष्य गाठण्यापेक्षा आपली आवड सुरुवातीपासूनच ओळखावी आणि त्याच मार्गाने आपली पावले टाकावी मग मार्ग कितीही कठीण का असेना. त्यामुळे आपल्याला यशही मिळेल आणि आत्मसंतुष्टी होईल.
समाजातील काही वाईट गोष्टींचे वाईट असेल तर पत्रकारितेची निवड करता येईल. जर इतिसहातील काही गोष्टीं समजून घेणे आवडत असेल तर पुरातत्व विभागातील करिअर निवडावे. लोकांना भेटणे त्यांना प्रेरणा देणे आवडत असेल तर एच आर म्हणजे मानवसंसाधन अधिकारी, विक्री अधिकारी, शिक्षक, समुपदेशक किंवा पर्यटन मार्गदर्शक म्हणून करिअर करता येईल. स्थापत्य कलेची आवड असल्यास आणि जागेचा योग्य वापर करण्याचे कौशल्य असल्यास सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपली कारकीर्द करु शकता.

कौशल्य ओळखा-
प्रत्येकामध्ये जन्मजात काही कौशल्ये असतात. काही जण त्याला कौशल्य किंवा जन्मजात गुण असतात. त्या गुणांना विकसित केल्यास तसेच नव्या काही विद्या शिकूनही त्यात भर घालता येते.

यश आणि पैसा –
आजचे तरुणांना ज्यामध्ये जास्त पैसा आणि यश मिळण्याची संधी असेल त्याचे आकर्षण जास्त असते. सिनेमातील फॅंटसीमुळे त्यांच्या स्वप्नांना अधिक वाव मिळतो.

तरुणांना फाईव्ह स्टार जीवनशैली अधिक आकर्षित करतात मात्र यश मिळण्यासाठी पत्रकार, लेखक, शेफ किंवा समुपदेशक या कारकिर्दीत संधी आहे. केवळ डॉक्‍टर, वकील किंवा इंजिनिअर हेच यशस्वी असतात असे नाही. कोणतेही करिअर निवडताना त्यात जीव ओतून काम केले पाहिजे तसेच यशाच्या नव्या दिशा शोधाव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)