कराड उत्तरमध्ये कॉंग्रेस उमेदवारासाठी प्रयत्न करणार

सत्यजित तांबे यांची कोपर्डेहवेली येथे चलो पंचायत कार्यक्रमात ग्वाही

कोपर्डेहवेली – सध्याचे सरकार निष्क्रीय असून अनेक आघाड्यांवर त्यांना अपयश आले आहे. ग्रामीण भागाकडे या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. आम्ही युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून गावोगावच्या पाच कोटी जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. कराड उत्तर मतदार संघात विधानसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार असावा यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.

कोपर्डे हवेली ता. कराड येथे येथे आयोजित चलो पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एन. एस. यु. आयचे सरचिटणीस शिवराज मोरे, वर्धन ऍग्रोचे धैर्यशील कदम, बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, निवास थोरात, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, कल्याणी मानगाळे, विवेक चव्हाण, महेश चव्हाण, डी. एस. काशिद, भीमराव डांगे, सुनील गायकवाड, जयदीप शिंदे, महेंद्र जाधव उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले, युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पाचकलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बेरोजगारांचे रजिस्ट्रेशन करुन त्यांना भत्ता देणे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे आदींसह इतर योजना सत्तेत आल्यावर राबविण्यात येणार आहेत. 2019 च्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असून युवकांनी कामाला लागावे. भाजप सत्तेवर आल्यास भविष्यात देशात निवडणुकाच होणार नाहीत.

धैर्यशील कदम म्हणाले, हा मतदारसंघ यशवंत विचाराचा आहे. परंतु दुर्दैवाने आज याच मतदार संघात सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. येथील आमदारांनी जनाधार गमावला आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम यांनी केले आहे. एकाच घरात अनेक वर्षांपासून सत्ता आहे. येथील परिस्थिती आज बदललेली आहे. नऊ पैकी चार गट कॉग्रेस विचारांचे आहेत. तरी हा मतदारसंघ युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सोडावा, अशी मागणी केली. प्रास्ताविक अमित जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डी. एस. काशिद यांनी केले. आभार विवेक चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)