कराडात 32 आंदोलकांवर गुन्हा

कराड – बंदच्या काळात बुधवारी शहर आणि परिसरातील गोटे व ओगलेवाडी येथे टायर पेटवून रस्त्यावर फेकल्याप्रकरणी अज्ञात 32 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
आंदोलकांनी गोटे येथील टायर दुकानदारास दमदाटी करत दुकानाशेजारी पडलेले जुने टायर पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पेटवून रास्ता रोको केला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास 10 ते 12 जणांनी हा प्रकार केला होता. याबाबत राम परशुराम पाटील यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा जमाव जमवून पाच मोटरसायकलवरून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील 10 ते 12 अज्ञात युवकांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण करत आहेत.
दरम्यान, ओगलेवाडी येथील रेल्वे पुललावर सकाळी पावणे दहाच्या सुमारास टायर पेटवून रस्ता रोखल्याप्रकरणी अज्ञात 15 ते 20 जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार सचिन काशिद यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास ओगलेवाडी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)