कराटे स्पर्धेचे वाकडमध्ये उद्‌घाटन

वाकड – कमल प्रतिष्ठाणचे माउंट लिटरा झी स्कूल आयोजित कराटे टोकयो 2020 महाराष्ट्र नोबुकावा – हा शितोरिया कराटे दो चॅम्पियनशीप स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, महिला अत्याचाराचे प्रमाण वाढल्यामुळे विद्यार्थिनींसह महिलांना कराटे प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे.

यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेविका स्वाती कलाटे, प्रशिक्षक देवेंद्र शर्मा, नंदकुमार दळवी, कमलेश पांडे, अशोक वेताळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन कै.तानाजी तुकाराम कलाटे एज्युकेशन कॅम्पस वाकड येथे करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)