करंजेपूल चौकात नो पार्किंग

श्रावणी सोमवारनिमित्त सोमेश्‍वरनगरला येणार असल्याने दक्षता

सोमेश्वरनगर -करंजेपूल (ता. बारामती) येथे नीरा-बारामती रस्त्यापासून प्रति सोरटी सोमेश्वर मंदिर हे 4 किलोमीटर अंतरावर असलेले देवस्थान आहे. उद्या श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असून येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने या रस्त्यालगत वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी व बेशिस्त पार्किंग, ट्रिपल सीट यावर होणार आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत करंजेपूल येथील सोमेश्वर मंदिर चौकामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग असे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकांच्या दोन्ही बाजूस पंधरा फूट अंतरावर कोणीही वाहने उभी अथवा वेळबाह्य थांबवू नयेत, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आलेले आहे. नीरा- बारामती लगत करंजेपूल हा मुख्य चौक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. येणारे वाहने नीटनेटकेपणाने पार्किंग करत नसल्याने हे फलक लावण्यात आले आहेत. वाहनचालकांनी रस्त्याच्या पांढऱ्या पट्टीच्या बाहेरील बाजूस वाहतूक अडथळा निर्माण करणार नाही, अशा प्रकारे वाहने उभी करावीत.

करंजेपूल येथील मुख्य चौकातील दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानदारांना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांना व्यवस्थित पार्किंग करावे आसे आवाहन सरपंच वैभव यांनी केले आहे.

  • सोमेश्वर देवस्थान परिसरात दुचाकी वाहनांचे सुरक्षित पार्किंग व्यवस्था तसेच चारचाकी वाहनांची त्याच्या विरुद्ध बाजूस आणि चारचाकी (मोठी) व अवजड वाहनांची पार्किंगची सोय देवस्थान मार्फत मोफत करण्यात आली आहे.
    -विनोद भांडवलकर, अध्यक्ष सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट
  • श्रावण महिन्यातील येणारा हा तिसरा सोमवार असून, भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही दक्ष राहणार आहोत, वेळप्रसंगी नियमबाह्य दुचाकी व चारचाकी वाहन चालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
    -बाळासाहेब पानसरे, पोलीस नाईक
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×