कदमवाकवस्तीजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

file photo

लोणी काळभोर- पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुण जागीच मरण पावला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मधुसूदन ज्ञानेश्वर काळभोर (वय 28, रा. शिवणे, पुणे, मूळ गाव आंबेगाव, केडगाव, ता. दौंड) हा तरुण मरण पावला. या प्रकरणी त्याचा चुलत भाऊ विनायक भगवान काळभोर (वय 48, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत दत्त मंदिराजवळ बुधवार (दि. 30) दुपारी दोनच्या सुमारास झाला. विनायक काळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (30) दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या चुलतभावाचे लग्न होते. मधुसूदन त्या लग्नासाठी आला होता. त्यानंतर पुण्याला परत जात असताना कदमवाकवस्ती जवळ तो दुचाकीवरून आला असता अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जबर मार लागल्याने मधुसुदन जागीच मरण पावला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)