कठुआ बलात्कार प्रकरण ; मुलीची केवळ हत्या झाली, बलात्कार नाही : साध्वी प्रज्ञा

गांधीनगर : काश्मीरमधील कठुआ सामूहिक प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट असताना या प्रकरणावर राजकारण सुरु आहे. त्यात काहींनी सकारात्मक तर काहींनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.या वादग्रस्त प्रतिक्रियांमध्ये आणखी एका प्रतिक्रियेची साध्वी प्रज्ञा ठाकूरकडून भर पडली आहे.

“कठुआ प्रकरण एक असे षडयंत्र आहे, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते, जे मुस्लीम, काँग्रेस आणि डावे आहेत.” “एवढे घृणास्पद कृत्य ज्याला बलात्कार म्हटले जाते, तो झालाच नाही. तिची केवळ हत्या झाली, हे वैद्यकीय अहवाल सांगतो. हत्या कोणी केली याची माहिती नाही. एका मुस्लीमाने आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप करत त्यात एका हिंदूला अडकवलं. यापेक्षा बीभत्स राजकीय षडयंत्र असूच शकत नाही,” असे साध्वी प्रज्ञा ठाकूरने म्हटले आहे. गुजरातच्या नवसारीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूरने वादग्रस्त विधान केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)