कठुआ बलात्कार प्रकरण ; अल्पवयीन आरोपीचा न्यायालयाने जामीन नाकारला

नवी दिल्ली : कठूआतील सामुहिक बलात्कार प्रकरणात न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीस जामीन देण्यास नाकारले आहे. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा महत्त्वपूर्ण अहवालदेखील न्यायालयात सादर केला.

गुन्हे अन्वेषण विभागाला बार कौन्सिल ऑफ इंडिया, जम्मू काश्मीरचे उच्च न्यायालयाचे बार असोसिएशन आणि सिव्हील सोसायटी यांच्या दबावानंतर तिसरी चार्जशीत न्यायालयात सादर करावी लागली. यात वैद्याकीय अहवालदेखील सादर करण्यात आला आहे. त्यानुसार त्या चिमुरडीवर बलात्कार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. हे सांगत असताना तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला नसल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे.  तसेच तिच्या शरीरासोबत छेडछाड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर मुलीला डांबून ठेवण्यात आले होते. दरम्यान, मुलीचा मृत्यू हा भूक आणि  हृदयाची गती मंदावल्याने झाली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)