कठुआ बलात्कार प्रकरणाची सीबीआयकडून नव्याने चौकशी व्हावी

अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची हायकोर्टात मागणी
जम्मू – कठुआ बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले सब इन्स्पेक्‍टर आनंद दत्ता आणि विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया यांनी जम्मू काश्‍मीर उच्च न्यायालयात अर्ज करून या प्रकरणात राज्य सरकारच्या क्राईम ब्रॅंचने आत्ता पर्यंत केलेला तपास रद्द करून या प्रकरणाची सीबीआय मार्फत नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. काल त्यांनी आपले वकिल वीणु गुप्ता यांच्या मार्फत हायकोर्टात या मागणीची याचिका सादर केली आहे.

या प्रकरणाचा तपास तीनवेळ तीन यंत्रणांकडे देण्यात आला आणि विशेष तपास पथकाने अंतिम तपास करून आरोपपत्र सादर केले आहे. तथापी हा सारा तपास रद्द करून नव्याने या प्रकरणाचा तपास केला पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर खून आणि बलात्काराचा आरोप आहे आणि जे अधिकारी आपली अटक टाळण्यासाठी तीन वर्षे बेपत्ता होते त्याच अधिकाऱ्यांचा समावेश करून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली हे आक्षेपार्ह आहे असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. मुलीचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट आणि फोरेन्सीक अहवाल यांच्यात खूप तफावत आहे.

क्राईम ब्रॅंचने याचा चुकीचा निष्कर्ष काढला आहे त्यामुळे त्यांचा तपास अंतिम न मानता याची नव्याने चौकशी झाल्याशिवाय खरे तथ्य बाहेर येणार नाहीं असेही या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावे बनावट आहेत आणि त्यात बरीच मोडतोड करून ते सादर करण्यात आले आहेत असेही यात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)