कठुआ प्रकरणातील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाची 7 मे पर्यंत स्थगिती

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सुनावणीला 7 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा आणि त्याची सुनावणी जम्मू काश्‍मीरातून हलवून चंदीगडला न्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत, त्याची दखल घेत ही स्थगिती देण्यात आली आहे.

सरन्यायाधिश दीपक मिश्रा, न्या डी वाय चंद्रचुड, आणि न्या इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला. आज या विषयावर सुनावणी सुरू असताना पीडित बालिकेच्या वकिल इंदिरा जयसिंग आणि आरोपींचे वकिल हरविंदर चौधरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. इंदिरा जयसिंग म्हणाल्या की चंदीगड हे ठिकाण कठुआच्या जवळ असल्याने तेथे हा खटला हलवण्यात यावा. कारण जम्मू काश्‍मीर राज्यात हा खटला चालवला जाणे शक्‍य नाही. तेथे न्यायाधिशांनाच धमकावण्याचा प्रकार घडला आहे. वकिलांनी क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांना कोर्टात धक्काबुक्की करण्याचाही प्रकार घडला असून तसे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने सादर केले आहे.

यावेळी आरोपींचे वकिल चौधरी म्हणाले की आमच्या आशिलाचा राज्य सरकारच्या पोलिस तपास यंत्रणेवर विश्‍वास नाही त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा. या प्रकरणातील आरोपी भलतेच असून पोलिसांनी त्यांना वाचवून दुसऱ्याच कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांचा स्थानिक न्यायालयातच हा खटला चालवण्याचा आग्रह आहे पण या प्रकरणाचा तपास मात्र स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात यावा असा त्यांचा आग्रह आहे त्यावेळी दोन्ही वकिलांमध्ये, बाचाबाची झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)