कठुआ घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

सांगवी – जम्मू काश्‍मीर मधील कठुआ अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ मानवी हक्क संरक्षण संघटना आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरव परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला.

स्वातंत्र्यच्या 70 वर्षानंतरही अशा लाजिरवाण्या घटना घडतात, याचा निषेध करत. पीडित चिमुरडीला श्रध्दांजली वाहण्यात आली. पिंपळे गुरव व राजमाता जिजाऊ उद्यान परिसरात कॅण्डल मार्च काढण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी अशी मागणी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी संस्थेच्या वतीने केली.

परिसरातील युवतींसह विकास कुचेकर, महाराष्ट्र युवक अध्यक्ष अभिषेक हरीदास, सतिश लालबिगे, उपाध्यक्ष विकास शहाणे, संगिता जोगदंड, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर, सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम, सुदाम जोगदंड, ऍड सचिन काळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, हुसेन मुलानी, ताहीर शेख, ईश्‍वर सोनोने, राहुल शेंडगे, सचिन नेमाडे, पंडित वनस्कर, वसंत चकटे, शिवानंद तालीकोटी, अंबादास शहाणे, दीपक शहाणे, ऋतुजा जोगदंड, श्रद्धा धुमाळ आदींनी यामध्ये सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)