कठीण वेळी कोणीही मदतीला आले नाही- बॉबी देओल

बॉबी देओल “रेस 3′ मधून परत पडद्यावर आला आणि आता सनी आणि पप्पा धर्मेंद्र यांच्याबरोबर “यमला पगला फिरसे’मधूनही तो येतो आहे. “रेस 3’ला म्हणावे तसे यश मिळाले नाही, पण यामुळे त्याला नव्याने सुरुवात करण्याचे निमित्त तरी मिळाले आहे असे तो म्हणतो. “रेस 3’च्या निमित्ताने त्याला भेटणाऱ्या लोकांमध्ये त्याला एक प्रकारची सकारात्मकता जाणवली. ही सकारात्मकता त्याला त्याच्या दुसऱ्या इनिंगसाठी फायदेशीर ठरते आहे. आता नव्या जोमाने तो पुन्हा कामाला लागण्यासाठी तयार झाला आहे. “रेस 3′ नंतर बॉबी टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांना जाऊन भेटत होता. त्यांनी आपल्याला नवीन सिनेमा मिळवून द्यावा, अशी साधी अपेक्षा त्याने केली होती, पण आपल्या कठीण वेळी कोणीही आपल्या मदतीला आले नाही, ही खंत त्याने बोलून दाखवली.

आपल्या दुसऱ्या इनिंगच्या निमित्ताने आपल्या बॅड पॅचबद्दल तो भरभरून बोलला. त्याचा त्याच्या निकटवर्तीयांकडून भ्रमनिरास झाला, ही बाब तो लपवून ठेवू शकला नाही. त्याच्या पडत्या काळामध्ये सनी आणि सलमान सोडता कोणीही त्याच्यासाठी पुढे आले नव्हते. सनीपेक्षा सलमाननेच त्याला अधिक मदत केली होती. सलमान तर बॉबीला धाकटा भाऊ मानतो. “रेस 3’च्या आगोदर सलमानने बॉबीला फिजीकल ट्रेनर देऊन व्यायामाची काही तंत्रेही शिकवली होती. मात्र, त्यांच्याशिवाय कोणीही आपल्या मदतीला आले नाही याचे त्याला दुःख झाले आहे. आता एका टीमने त्याच्या मॅनेजमेंटची जबाबदारी सांभाळली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फार मोठ्या गॅपनंतर बॉबी पुन्हा पडद्यावर सक्रिय होतो आहे. “रेस 3′ नंतरचा “यमला पगला दीवाना फिरसे’ पुढील आठवड्यात येतो आहे. सध्या साजिद नाडियादवालाच्या “हाऊसफुल्ल 4’च्या शुटिंगची तो तयारी करतो आहे. “यमला पगला…’च्या सिरीजमधील पहिल्या दोन सिनेमांचे डायरेक्‍शन करणाऱ्या साजिद खानवर आता सिरीजमधील चौथ्या सिनेमाचीही जबाबदारी आहे. “हाऊसफुल्ल 4’ची कथा ही पुनर्जन्माशी संबंधित असणार आहे. चंकी पांडे, जॉनी लिव्हर, बोमन इराणी, नाना पाटेकर ही सगळी गॅंग “हाऊसफुल्ल 4’मध्ये असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)