कचऱ्याचे नियोजन करुन मिळकरात घसघशीत सूट मिळवा : ममता गायकवाड

वाकड- कचऱ्यापासून खतनिर्मिती व सौरउर्जासारके लोकोपयोगी प्रकल्प राबविणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेने मिळकतकरात घसघशीत सूट दिली आहे. त्याचा फायदा घेऊन शहराच्या विकासात सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी केले.

वाकड परिसरातील लॉरेल हौसिंग सोसायटीने राबवण्यात आलेल्या सौरउर्जा व खतनिर्मिती प्रकल्पाचे स्थायी समिती सभापती ममता गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, सोसायटीचे चेअरमन कवलजित कौर सेठी, सेक्रेटरी मनोज कुमार सिन्हा, कमिटी सभासद असिफ जैन, विशाल लाड, अमित मित्तल, प्रतिक ठक्कर व सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

या प्रकल्पाविषयी वाकड परिसरात स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी सर्व सोसायटी मध्ये बैठक घेऊन सौर उर्जा, खत निर्मिती, कचरा विलगीकरण आदी प्रकल्प राबविण्याकरिता नागरिकांच्या हिताच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने हे प्रकल्प सोसायटींमध्ये राबविण्यासाठी प्रोत्साहन देऊन जनजागृती सुरू आहे. गेली अनेक महिन्यांपासून याठिकाणी सौरउर्जा प्रकल्प सुरू असून, त्यातून त्य सोसायटीची जवळपास 75 टक्के वीज बचत होत आहे. तसेच येथील सभासद खत निर्मिती प्रकल्प आपल्या सोसायटीमध्ये राबवत असून 100 टक्के कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावत आहेत. याबाबत सोसायटीमधील सर्व सभासदांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी ममता गायकवाड म्हणाल्या की, लॉरेल सोसायटीने हे प्रकल्प राबवून सर्व सोसायटी धारकांसाठी एक रोल मॉडेल तयार केलेले आहे. या लॉरेल सोसायटीचा वाकड परिसरातील व आजूबाजच्या सोसायटीमधील नागरिकांनी आदर्श घेऊन असे जनहिताचे व पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून मिळकत करात घसघशीत सवलत मिळवावी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)