कचरा समस्येवर उदयनराजेंचे खडेबोल

कचरा ही सार्वत्रिक समस्या आहे. कचरा मुक्‍त शहर ही सातारकरांच्या हिताची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी, नगरपरिषदेच्या मागिल 40-50 वर्षाच्या इतिहासात, कधीही इतक्‍या मोठया प्रमाणात सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली असून, या वाहनांचा कार्यक्षम वापर करुन, कचरा समस्यां उद्‌भवणार नाही याची काळजी घ्या असा आदेश सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी आणि पदाधिका-यांना दिला.

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकरीता नगरपरिषदेने तयार केलेल्या आणि शासनाने मंजूर केलेल्या डि.पी.आर.(डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट रिपोर्ट) नुसार दोन जेसीबी, दोन टिपर आणि एक ट्रॅक्‍टर, चार फॉगिंक मशिन, दोन ग्रास कटींग मशिन, जीईएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आले आहेत, त्याचा लोकार्पण आणि पूजन प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन सभापती सौ.स्नेहा नलवडे, मागासवर्गीय कल्याण विशेष समितीच्या सभापती सौ.संगिता आवळे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, यांचे सह नगरसेवक,नगरसेविका प्रमुख उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आम्ही असलो तरी सातारा विकास आघाडी ही सर्व सातारकर नागरिकांची आहे. सातारकरांच्या हितासाठी जे करणे आवश्‍यक आहे ते ते आम्ही करण्यास कधीही मागे राहीलेलो नाही. सध्या कचरा ही समस्या सर्वच शहरांना भेडसावत आहे. कोणत्याही परिस्थितीत कचरा योग्य वेळी उचलला जावा म्हणून यांत्रिकीकरणावर भर देत, आज एकूण 70 लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत.या वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीतही उपयोग केला जावू शकणार असून, कचरा साठू नये म्हणून आधुनिक पध्दतीची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे , असे ही ते पूढे म्हणाले.

या दोन जेसिबींचा आणि दोन डंपरचा चांगला आणि कार्यक्षमपणे उपयोग करुन, कचरा ही समस्या भविष्यात भेडसावणार नाही याची दक्षता आणि काळजी आता अधिका-यांनी आणि पदाधिका-यांनी घ्यावी अश्‍या आमच्या सूचना आहेत. स्वच्छतेकरीता आम्ही कोणतीही तडजोड स्विकारणार नाही अश्‍याही सूचना यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.

प्रथम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनांचे पुजन केले. तसेच नव्याने घेतलेल्या टिपरच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, यशोधन नारकर यांना समवेत घेत, टिपर स्वतः वाहन चालवून बघितले. यावेळी आरोग्य सभापती यदु नारकर यांना सर्वात आधी नारळ वाढवायला सांगून नागरिकांच्या आरोग्याची धुरा आता स्वत: पुढे येऊन घ्या असे सांगून पुढील नियोजनाचा संकेत खा. उदयनराजे यांनी सर्वासमोर दिला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजु भोसले, माजी आरोग्य सभापती (वसंतअण्णा) लेवे, नगरसेविका लता पवार,सौ.सुमती खुटाळे, सुनिता पवार, सविताताई फाळके,सौ.स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडीक, निशांत पाटील, अल्लाउद्‌दीन शेख, किशोर शिंदे, ज्ञानेश्‍वर फरांदे, सौ.रजनी जेधे, सौ.सीता हादगे, सौ.अनीता घोरपडे, नगरपरिषदेचे अधिकारी विवेक जाधव, राजेंद्र कायगुडे, प्रविण यादव, जालिंदर रणदिवे, गणेश टोपे, सौरभ साळुंखे, राजेश भोसले, संदिप सावनूर, दत्ता जाधव, सोमनाथ वाघमारे, मयुर क्षिरसागर आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)