कचरा दुर्गंधीमुळे केसनंद मध्ये जलप्रदूषण

वाघोली- केसनंद (ता. हवेली) येथील शौर्यपार्क या रहिवासी इमारतीसमोर कोलवडी येथील एका नागरिकाने स्वतःच्या जागेत खड्डा खोदून त्यात ओला-सुका तसेच प्लॅस्टिकचा कचरा टाकल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या प्रकरणी नागरिकांनी लोणीकंद पोलीस ठाणे, गट विकास अधिकारी हवेली, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या प्रकरणी 27 ऑगस्ट रोजी वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने पाहणी केली असून पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. खड्ड्यात अस्वच्छ पाणी साठल्यामुळे परिसरातील जलस्रोत दुषित होत आहेत. तसेच या ठिकाणी डासांचे साम्राज्य वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्यास घातक परिस्थिती निर्माण होऊन जलजन्य व किटकजन्य या प्रकारचे साथीचे आजार पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकारी एन. एच. लोखंडे यांनी दिला आहे. यावर ग्रामपंचायत केसनंद, कोलवडी, गटविकास अधिकारी हवेली आणि तालुका आरोग्य अधिकारी कारवाई करतील. संबंधितांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  • केसनंद (ता. हवेली) येथील शौर्यपार्क मधील नागरिकांना जलप्रदूषण, वायू प्रदूषण तसेच कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
    सचिन जाधव
    सदस्य ग्रामपंचायत केसनंद 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)