कचरा डेपो हटवण्याची मागणी

भारिप बहुजन महासंघाचा शेतकरी चौकात रास्ता रोको

वडूज, दि. 29 (प्रतिनिधी) – नगरपंचायत प्रशासनाने येथील कचरा डेपो इतरत्र हलवावा, या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने शेतकरी चौकात सुमारे एक तास रास्ता रोको करत घोषणाबाजी केली.
खटाव तालुका युवक अध्यक्ष आकाश रायबोळे, तालुकाध्यक्ष सुनिल कदम, शहराध्यक्ष दीपक उर्फ कुणाल रायबोळे, नगरसेवक प्रदीप खुडे, विनोद शिंदे, अमोल जगताप, भरत घनवट, नवनाथ खुडे, आनंदा दुबळे, मुकेश माने, शिवाजी रायबोळे, आप्पा खुडे, सचिन भोंडवे, अभिजित सरतापे, सचिन कांबळे यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी कचरा डेपो हललाच पाहिजे, अशा घोषणा देत रास्ता रोको केला. वडूजची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कचराही वाढला आहे. या डेपोच्या आसपास राहात असलेल्या वसाहतीचा नगरपंचायत गांभीर्याने लक्ष देत नाही. अनेकवेळा लेखी पत्र देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. तेथील लोकांना संसर्गजन्य रोग तसेच कचरा पेटवल्याने येणारी दुर्गंधी यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
तसेच या डेपोलगत वाणी समाज, मुस्लिम समाज आदींच्या स्मशान भूमी असून मानसिक भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे नगरपंचायत प्रशासनाने त्वरित कचरा डेपो हलवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नगरपंचायतीने सोमवारी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक व बहूजन महासंघाचे पदाधिकारी यांची बैठक लावली असल्याचे नगरसेवक अनिल माळी, डॉ. महेश गुरव, शहाजीराजे गोडसे, अधीक्षक राजेंद्र काटकर यांनी यावेळी सांगितले.

कचरा डेपो गावापासून लांब असावा यासाठी नगरपंचायतीने शासन स्तरावर मागणी केलेली असून पाठपुरावा सुरू आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील असून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम एका संस्थेकडे दिले आहे. त्याचीही अंमलबजावणी लवकरच करणार आहेत. कचरा डेपोसाठी शासनाकडे जागेची मागणी केली आहे.
विपुल गोडसे, उपनगराध्यक्ष

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)