कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी बाळगावी – अमिताभ कांत

रोजगार निर्माण करणारे सीएसआर उपक्रम हवे 
नवी दिल्ली – कंपन्यानी सामाजीक बांधिलकीची जाण ठेऊन सीएसआरचे काम करावे, असे आवाहन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यानी केले. यांनी फरेरोच्या शेअरिंग व्हॅल्यूज टू क्रिएट व्हॅल्यू यावरील 8 व्या जागतिक सीएसआर अहवालाचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमावेळी इटलीचे राजदूत लॉरेंझो अँजेलोनी व फरेरो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो पेल्ले उपस्थित होते. कांत यांनी सांगितले की, कंपन्यांनी मेक इन इंडियावर भर देत शाश्‍वत विकासास मदत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्यानी ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, फरेरो इंडियाचा भारताशी असलेला सहयोग दशकाहून जुना आहे आणि त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे बारामतीचे रूपांतर भरभराट होणाऱ्या औद्योगिक केंद्रामध्ये झाले आहे. फरेरो यशाचे मापन करण्यासाठी बॅलन्सशीटच्या पुढे जाऊन विचार करते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लॉरेंझो अँजेलोनी म्हणाले, बारामती प्रकल्पातील व परिसरातील समाजाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने कंपनीने आयोजित केलेल्या सीएसआर उपक्रमांचा अभिमान वाटतो. स्टेफानो पेल्ले यांनी मेक इन इंडिया उपक्रमाविषयी कंपनीशी असलेली बांधिलकी व्यक्‍त केली. भारतातील बारामती प्रकल्पातील मिशेल फरेरो आंत्रप्रिन्युअल प्रोजेक्‍टद्वारे आम्ही कमी विकसित परिसरांत नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि प्रशिक्षण व कौशल्ये पुरवली आहेत आणि त्यानिमित्ताने समाजामध्ये खऱ्या अर्थाने शाश्‍वत विकास साधला आहे. आमचा प्रकल्प असलेल्या क्षेत्रात, आम्ही आरोग्याची देखभाल व बालकांसाठी शिक्षण यांना चालना देणाऱ्या सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देतो. फरेरो समूहाकडील भारतातील मनुष्यबळ इटली व जर्मनी या देशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)