कंपनीची साडेपाच लाखांची फसवणूक करणाऱ्या सेल्समनला तीन वर्ष सक्तमजुरी

1 लाख 44 हजार रुपयांचा नुकसान भरपाई


प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.के.खराडे यांचा आदेश

पुणे- सिमेंटची डीलरशीप असलेल्या कंपनीची विविध मार्गांनी साडेपाच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सेल्समनला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 1 लाख 44 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निकाल न्यायालयाने दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी हा आदेश दिला.
अभिलाष शंकर पटेल (वय 21, रा. श्रीराम सोसायटी, चंदननगर, मुळ रा. शहादा, नंदुरबार) असे शिक्षा देण्यात आलेल्या सेल्समनचे नाव आहे. याबाबत राजेंद्र बंशीधर अग्रवाल (वय 57, रा. कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली होती. अग्रवाल यांची राजेश कान्स्ट्रो ट्रडींग प्रा. लि. नावाची कंपनी आहे. पटेल हा त्यात सेल्समन म्हणून कामाला होता. अग्रवाल हे डोळ्यांच्या उपचारासाठी 15 जून 2015 ते 19 जुलै 2015 दरम्यान कंपनीत आले नव्हते. सुटीवरून ते कंपनीत आल्यानंतर त्यांना कंपनीच्या बॅंक खात्यातून 3 लाख 91 हजार रुपये एनएफटीद्वारे डेबीट झाल्याचे समजले. त्याबाबत चौकशी केली असता हे पैसे पटेल यांनी काढले असल्याचे समजले. त्याने 3 लाख 91 हजार रुपयांपैकी 1 लाख 15 हजार रुपये काढले होते. मात्र त्याबाबत तक्रार दिल्यानंतर त्याचे खाते गोठविण्यात आले होते. दरम्यान पटेल याने बनावट कंपनी स्थापन करून त्याद्वारे अग्रवाल यांच्या कंपनीला 1 लाख 12 हजार 200 रुपये किंमतीच्या 340 सिमेंटच्या बॅगची ऑर्डर दिली. ऑर्डर दिलेल्या ठिकाणी जावून पाहिले असते प्रत्यक्षात कंपनीच नसल्याचे निदर्शनात आले होते. तसेच पटेल याने 14 जुलै 2015 रोजी कंपनीच्या ड्रॉवरमधील 61 हजार रुपये चोरले, अशी देखील फिर्याद देण्यात आली होती. याप्रकरणात कंपनीची एकूण 5 लाख 64 हजार 200 रुपयांची फसवणूक झाली होती. सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी या प्रकरणात 10 साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी म्हणून वैशाली इंगले यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)