“कंदील’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

वेगळ्या धाटणीचा “कंदील’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकानं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. श्रीमंत होऊ पाहणाऱ्या झोपडपट्टीतील पाच मुलांची अनोखी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काहीतरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर भाष्य करणारं कथानक पाहायला मिळणार असे दिसते. “कंदील’ची कथा हातात आल्यानंतर महेशने हा विषय पडद्यावर कशा पद्धतीने मांडायचा यासाठी तीन वर्षे झोपडपट्टी भागात जाऊन पाहणी केला.

संपूर्ण सिनेमा आधी मोबाइलमध्ये चित्रित करून पाहिला आणि नंतरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. शूटिंग करतानाही “कंदील’च्या टीमला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला, तरीही न डगमगता महेशनं नवोदित कलाकार-तंत्रज्ञांचा संच सोबत घेऊन अखेर चित्रपट पूर्ण केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.