कंटेनरच्या धडकेत नऊ गाळे उध्वस्त

पाडेगाव टोलनाक्‍यावर पुन्हा भीषण अपघात

उर्वरित तीन गाळे खिळखिळीत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टोलनाका लवकरात लवकर हटवण्यासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

लोणंद, दि. 29 (प्रतिनिधी) –
एकाच महिन्यात पाडेगाव टोलनाक्‍यावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. रात्री एकच्या सुमारास टोलनाक्‍याजवळ असणारे पाडेगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बारा पैकी नऊ व्यावसायिक गाळे कंटेनरच्या धडकेत पुर्णतः उध्वस्त झालेले आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की दहा व्यापारी गाळे छपरासहीत कोलमडून पडले आहेत. अपघात रात्री उशीरा घडल्याने मोठी जिवीतहानी टळलीे. अपघातात वीस चाकी कंटेनर चालक शिवदास साहू (वय 22) हा जखमी झाला आहे. त्याला लोणंद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाताच लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि गिरिश दिघावकर आणि सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ता सुरळीत चालू केला. या अपघाताची फिर्याद पाडेगावचे सरपंच हरिश्‍चद्र माने यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
पाडेगाव टोलनाका परिसरातील अपघाताची मालिका अजूनही थांबायचे नाव घेईना. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास सुरवडी येथील कमिन्स कंपनीतून जनरेटर घेऊन मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात निघालेला भरधाव कंटेनर ट्रक (क्रमांक एमएच 42 एच 5807) निरा नदी जवळ असलेल्या पाडेगाव टोलनाक्‍यावर आला असता चालकाचा वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने रस्ता सोडून सरळसरळ बाजूला साधारण अडीच ते तीन फूट उंचीवर असलेल्या व्यापारी गाळ्याना धडकला. या धडकेत सलग दहा गाळे जमीनदोस्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)