औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

पिंपरी – देशात सुरू असलेल्या ई – फार्मसी तथा ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी (दि. 28) कडकडीत बंद पाळला.

ई – फार्मसी व ऑनलाईन औषध विक्रीला केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा विरोध आहे. संघटनेकडून देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. शहरातील 80 होलसेल व 1600 रिटेलर औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अत्यावश्‍यक सुविधा म्हणून दोन मेडिकल सुरु ठेवण्यात आले होते. काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनच्या पुढाकाराने काळेवाडी येथे सकाळी निदर्शने करण्यात आली. यानंतर पुणे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने पुण्यातील केमिस्ट असोसिएशन भवनात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी व एफडीए आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. ऑनलाईन फार्मसीवर सरकारने कारवाई करावी अन्यथा बेमुदत संप पुकारावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अधिक माहिती देताना केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर म्हणाले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे युवा पिढी विविध प्रकारची औषधे नशापोटी खरेदी करून ती व्यसनाधीन होत आहेत. नकली तसेच कमी दर्जाची औषधे या ई – फार्मसी व ऑनलाईनवरून पुरविली जाण्याची शक्‍यता आहे. ऑनलाईनवर औषधे उपलब्ध करणाऱ्या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. औषधांवर या कंपन्या सूट देऊन लोकांना आकर्षित करत आहे. त्यापासून लोकांनी सावध राहणे गरदेते आहे. या कमी दर्जाच्या व नकली औषधांमुळे लोकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. औषधे ऑनलाईनवरून उपलब्ध करून या कंपन्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.ऑनलाईनवरून औषध पुरवठा करणाऱ्या काही बोगस ऑनलाईन कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या ऑनलाईनचा गैरवापर काही दलाल करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने कारवाईचे पाऊल उचलणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)