औषध निर्मितीसाठी भारताला ‘या’ आफ्रिकन देशाचे सहकार्य

नवी दिल्ली : होमिओपॅथी आणि पारंपरिक औषध पद्धती या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत भारत आणि साओ टोमे आणि प्रिन्सीप या आफ्रिकन देशात झालेल्या सामंजस्य करारालाकेंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी या दोन्ही देशांत हा करार झाला होता.

भारताला वनौषधींसह पारंपरिक औषध पद्धतीचे वरदान आहे. शिवाय या औषधीना जागतिक आरोग्य क्षेत्रात याला मोठा वाव आहे. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध यासारख्या पारंपरिक आयुर्वेद पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक औषध पद्धतीचा जगभरात प्रसार करण्यासाठी आयुष मंत्रालय कार्यरत असून, मलेशिया, त्रिनिनाद आणि टोबॅगो, हंगेरी, बांगलादेश, नेपाळ, मॉरीशस इराण या देशांशी भारताने पारंपरिक औषध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान, साओ टोमे आणि प्रिन्सीप देशाशी झालेल्या करारामुळे औषध निर्मिती क्षेत्रात नवीन पाऊल पडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)