औरंगाबाद : कचरा प्रश्नी नियोजनबद्ध काम करण्याचे आदेश

औरंगाबाद : येत्या 30 एप्रिलपर्यंत रस्त्यावरील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावून इतर ओल्या कचऱ्यावर कंपोस्टींग प्रक्रिया तत्परतेने करुन लवकरात लवकर औरंगाबाद स्वच्छ, सुंदर करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे दिले.

वाल्मी येथे औरंगाबाद शहरातील कचऱ्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आढावा घेतला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह महानगर पालिकेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

शहरातील कचरा प्रश्नाची सोडवणूक करताना नागरिकांच्या आणि सफाई कर्मचारी, प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्वांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत प्रतिबंधात्मक ठोस उपाययोजनासह कचरा प्रश्न शाश्वत पद्धतीने सोडवावा. तसेच सुक्या कचऱ्याच्या पुढील प्रक्रियेसाठी विविध सिमेंट कंपन्या इतर उद्योजकांशी चर्चा करुन विल्हेवाटीची योग्य पर्यायी व्यवस्था करावी.कचरा वर्गीकरणा साठीच्या शेडची संख्या वाढविण्यात यावी.

जनजागृतीवर भर देऊन ओला व सुका कचरा वर्गीकृत करण्याची सवय मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये निर्माण करावी, जेणेकरुन भविष्यात तत्परतेने दररोज तयार होण्याऱ्या कचऱ्यावर योग्य ती विल्हेवाटीची प्रक्रिया करणे सुलभ होईल. त्यादृष्टीने संबंधितांनी नियोजनबद्ध रित्या काम करुन औरंगाबाद जिल्ह्यातील  काम इतर जिल्ह्यांसाठी रोलमॉडेल ठरेल. या व्यापक उद्देशाने काम करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी दिल्या. बैठकीस वॉर्ड अधिकारी व इतर संबंधित उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)