औद्योगिकरणामुळे पळवे, बाबुर्डी वन्यप्राण्यांचे जीवन धोक्‍यात

सुपा – पारनेर तालुक्‍यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या पळवे, बाबुर्डी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याच्या प्रक्रिया चालू असून यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या जमिनी अधिग्रहण केल्यास वन्य प्राण्यांचे जीवन संपुष्टात येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून याबाबत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.
याबाबत शेतकरी कल्याणकारी संस्था पळवे बुद्रुकचे अध्यक्ष विजय ठुबे, उपाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, खजिनदार राजेंद्र कळमकर, सचिव दादाभाऊ दिवटे व सदस्यांच्या वतीने ना. मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, बाबुर्डी, पळवे येथील रहिवाशी असून तेथे जमिनी आहेत. या जमिनीच्या आसपास वर्षानुवर्ष हरणांची व इतर वन्यजीवांचे कळपे वावरतात व जगतात. बऱ्याच वेळी तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही करतात. तरीही कधीही त्यांना इजा पोहोचविली नाही. याउलट त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. परंतु आता पळवे बु. व बाबुर्डी या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होणार असल्याने निश्‍चितच वन्य प्राण्यांचे जीवन धोक्‍यात येणार आहे. या परिसरात औद्योगिकरण होऊ न देता वन्यप्राण्यांचे जीवन सुरक्षित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, वनक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)