ओशोच्या मृत्युपत्राची मूळप्रत भारतात येणार ?

मुंबई: आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासाचा प्रगती अहवाल बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला. केंद्रातील पराराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने तपासयंत्रणा स्पेन न्यायालयातून ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतीय न्यायालयात सादर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने 29 जूनपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब केली आहे.

पुढील सुनावणीस तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टींनी मालमत्ता हडपल्याचा आरोप ओशो अनुयायांचा आहे याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी याप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखी खाली व्हावा अशी मागणी उच्च न्यायालयात केली.

हायकोर्टाला दिलेल्या माहितीनुसार सध्या उपलब्ध असलेल्या मृत्यूपत्राच्या झेरॉक्सवरून त्याची सत्यता तपासण्यात असमर्थ असल्याचं हँडराइटिंग एक्सपर्टनं कळवलं आहे. त्यामुळे परदेशातील स्पेनच्या कोर्टात यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यातील मूळ कागदपत्रे आणि मृत्यूपत्राची प्रत मागविण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न सुरु आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)