ओबीसी महासंघाला बाजू मांडण्याची संधी द्यावी!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून कुणबी जात दाखल्यावर विविध पक्षांकडून निवडून आलेल्या सदस्यांविरोधात जात पडताळणी समितीकडे व न्यायालयाकडे दावे प्रलंबित आहेत. या दाव्यांच्या सुनावणी प्रसंगी बारा बलुतेदार महासंघ आणि ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींना बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात यावी, अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप गुरव यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, विशाल जाधव, प्रदीप पवार, भिकाजी भोज, वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, नंदा कऱ्हे, भारत भोसले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रताप गुरव यांनी सांगितले की, पिंपरी महापालिकेत 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर पदाचे आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठी आहे. भाजपाने महापौर पदासाठी कुणबी जात दाखला सादर करुन निवडून आलेले नितीन काळजे यांना महापौरपद बहाल केले. हे प्रकरण न्यायप्रवीष्ठ असताना त्यांची महापौरपदी वर्णी लागली. आता पुन्हा महापौर निवडणुकीचे बिगुल वाजले असून नवीन महापौर पदावर मुळ ओबीसी सदस्याला नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)