ओतूरमध्ये हल्ल्‌याच्या निषेधार्थ कडकडीत बंद

ओतूर- पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ओतूर बंदला आज (दि. 20) मोठा प्रतिसाद मिळला. बंदमधून जीवनावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. या बंदमध्ये सर्व व्यापारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बंदमुळे ओतूरमधील वर्दळीचे रस्ते, मुख्य बाजारपेठ ओस पडले होते. यावेळी वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व व्यवसाय बंद ठेवून शांततेत निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तानच्या निषेधार्थ सर्व ग्रामस्थांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी असोसिएशन, तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.