ओएलएक्‍सवर कार विक्रीच्या बहाण्याने गंडा

पिंपरी – ओएलएक्‍सवर कार खरेदीच्या बहाण्याने तरुणाकडून वेळोवेळी तीन बॅंक खात्यांवर एकूण 2 लाख 24 हजार 995 रुपये भरण्यास सांगितले. पैसे मिळताच त्या कार मालकाने तरुणाला कार तर दिलीच नाही. तसेच त्याचे पैसे ही बुडवले. ही घटना काळेवाडी येथे उघडकीस आली.

मयूर दिलीप चव्हाण (वय-19, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तामीर तेजकुमार (रा. अहमदाबाद, गुजरात), कल्लू आणि राम या तिघांविरोधात वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मयूर यांना कार खरेदी करायची होती. यामुळे त्यांनी ओएलएक्‍स या कार खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटला भेट दिली. तेथे त्यांना आरोपींची एक स्वीफ्ट डीजायर कार पसंत पडली. यावर त्यांनी त्यांना फोन करुन 2 लाख 24 हजार 995 रुपयात सौदा पक्का केला. सौदा होताच मयूर याने तिघा आरोपींच्या तीन विविध बॅंक खात्यांमध्ये एकूण 2 लाख 24 हजार 995 रुपये भरले. पैस मिळून देखील आरोपींनी मयूर यांना कारही दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाही. यावर मयूर याला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)