ओंकार अग्निहोत्री, रोहित शिंदे, अंशुल सातव यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

अरुण वाकणकर मेमोरियल करंडक पुरुष टेनिस स्पर्धा 

पुणे – ओंकार अग्निहोत्री, रोहित शिंदे व अंशुल सातव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना अरुण वाकणकर मेमोरियल करंडक पुरुष टेनिस स्पर्धेतील पुरुष खुल्या गटात विजयी सलामी दिली. मंदार वाकणकर टेनिस अकादमी यांच्यातर्फे पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्‍कन जिमखाना कोर्टवर सुरूुरु असलेल्या या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या पहिली फेरीत ओंकार अग्निहोत्रीने पृथ्वीराज पाटीलचा 6-3 असा, तर अजय चौहानने जगदीश सुंदरचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. अन्य सामन्यात अव्वल मानांकित रोहित शिंदे याने प्रांजल देशपांडेचा 6-0 असा सहज पराभव केला. तर करण थरानीने अमित शर्मावर 6-1 असा विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत अंशुल सातवने मंदार मेंसगीला 6-4 असे पराभूत केले. तसेच सौतिक घोष याने ज्ञानेश्वर पाटीलचा 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

हौशी गटात विवेक खडगे, बूुनो रुबिनो, अमित शर्मा, आर्यन हूड, अभिषेक सिंग, अभिषेक चव्हाण, प्रदीप बेपारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. स्पर्धेचे उद्‌घाटन गेम ऑन इव्हेंटस्‌चे सुनील लुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मंदार वाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल- 
हौशी गट- दुसरी फेरी- विवेक खडगे वि.वि. सी कुमार 6-5 (7-1); बूुनो रुबिनो वि.वि. डॉ.राम नायर 6-3; अमित शर्मा वि.वि. अक्षय पाटील 6-2; आर्यन हूड वि.वि. संजय आशर 6-0; सौतिक घोष वि.वि. शिव आशिष 6-2; अभिषेक सिंग वि.वि.विवेक जोशी 6-0; अभिषेक चव्हाण वि.वि. आदित्य सोंडकर 6-0; प्रदीप बेपारी वि.वि.गजानन कुलकर्णी 6-3; पुरुष एकेरी गट- पहिली फेरी- ओंकार अग्निहोत्री वि.वि. पृथ्वीराज पाटील 6-3; अजय चौहान वि.वि. जगदीश सुंदर 6-4; रोहित शिंदे (1) वि.वि.प्रांजल देशपांडे 6-0; करण थरानी वि.वि.अमित शर्मा 6-1; अंशुल सातव वि.वि.मंदार मेंसगी 6-4; सौतिक घोष वि.वि. ज्ञानेश्वर पाटील 6-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)