ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा

संग्रहित छायाचित्र....

मोहम्मद आमीरला संघातून मिळाला डच्चू

लाहोर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाने शुक्रवारी 17 सदस्यीय संघ जाहीर केला असुन आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर संघात अपेक्षित बदल करण्यात आले आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याचा दावा करणाऱ्या गोलंदाज मोहम्मद आमिरला तोंडघशी पडावे लागले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने आमिरला पाकिस्तान संघाने घरचा रस्ता दाखवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या संघात पाकिस्तानने फिरकीपटू यासिर शाहवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. यासीरने 2015 च्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानने ती मालिका 2-0 अशी जिंकली होती. पाकिस्तानने या चमूत यासिरसह 19 वर्षीय फिरकीपटू शाबाद खान आणि 33 वर्षीय फिरकीपटू बिलाल आसिफ यांनाही स्थान दिले आहे.

पाकिस्तान संघ – सर्फराज अहमद (कर्णधार), अझर अली, फाखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम, असद शफिक, हॅरिस सोहैल, उस्मान सलाहुद्दिन, यासिर शाह, शाबाद खान, बिलाल आसिफ, मोहम्मद अब्बास, हसन अली, वहाब रियाझ, फहीम अश्रफ, मीर हम्झा, मोहम्मद रिझवान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)