ऑस्करच्या यादीत सातारचे लेखक नितीन दीक्षित

सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) – येथील लेखक, दिर्शक नितीन दीक्षित यांच्या “कडवी हवा’ व “हलका’ या चित्रपटांची ऑस्कर निवड चाचणीच्या यादीत निवड झाली. ऑस्कर साठी त्यांचे नामांकन जरी झाले नसले, तरी मी लिहिलेल्या फिल्म ऑस्करच्या यादीत समाविष्ट झाली ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रीया दीक्षित यांनी व्यक्त केली.
सातारा मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळी येथील रहिवासी असलेल्या नितीन दीक्षीत यांचे प्राथमिक शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत तर माध्यमिक शिक्षण अनंत इंग्लिश स्कुल सातारा येथे झाले.
ते म्हणाले, लहानपणापासूनच गोष्टी रचून सांगण्याची आवड होती. गोष्ट सांगण्याची हीच आवड माझ्यातल्या लेखकाला समृध्द करत आहे. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात शिक्षण घेताना. मी 1992 साली युथ फेस्टिवल मध्ये उलटा पुलटा ही पहिली एकांकिका लिहली.
सातारा ते मुंबई हा प्रवास खुप अडचणींचा होता. यामध्ये साताराच्या बाळकृष्ण शिंदे, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, अमित देशमुख, जितेंद्र खाडिलकर, राजेश नारकर या मित्रांचे मोलाचे सहकार्य मिळाले. माझी आई नेहमी मी या अनिश्‍चितता असलेल्या क्षेत्रात काम करत होतो त्याची काळजी करायची. तिला माझी काळजी वाटायची. मोठा भाऊ दीपक याने आई-वडिलांची जबाबदारी सांभाळत मला मोलाचा आधार दिला. मराठी लेखकांना हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये खुप मान-सन्मान मिळतो. मराठी चित्रपटांमध्ये केले जाणारे वैविध्यपूर्ण प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळतो व त्याची कदर केली जाते. एका चांगल्या गोष्टीतुन दुसरी चांगली गोष्ट घडत जाते . तसेच “कडवी हवा’ व “हलका’च्या बाबतीत घडले. या चित्रपटाचे दिग्दर्शक निला माधब पांडा यांनी मला लेखनाची संधी दिल्याने आज या फिल्म ऑस्करच्या यादीपर्यंत पोहचल्या. लेखक म्हणून मला ही बाब अभिमानास्पद वाटते. भविष्यात ऑस्कर मिळवायचे आहे ; त्यादृष्टीने चांगले विषय हाताळायचे आहेत, असेही दीक्षीत म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)