ऑनलाईन विक्री निषेधार्थ 2200 केमिस्ट दुकाने बंद

सातारा ः सातारा केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. (छाया ः संजय कारंडे)

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची ऑनलाईन विक्री करण्याबाबत. तसेच ई मेल फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारत भर केमिस्टसने एक दिवस बंद पुकारला.2200 दुकाने बंद ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना याबाबत निवेदन दिल्यानंतर केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी बंदबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, ऑनलाईन फार्मसीला आमचा तीव्र विरोध आहे. यामुळे संस्थेतील सदस्यांना त्यांच्या व्यवसायात नुकसान होणार आहे. ऑनलाईन विक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे तरुण पिढीचे कधी न भरून येणारे नुकसान होणार आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रॅगिस्टचे अध्यक्ष जे. एस. शिंदे म्हणाले, केंद्र सरकार व संबधित मंत्री व विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन यांना वारंवार निवेदने दिली आहेत. तसेच ई फार्मसीज, पोर्टल्स व इंटरनेटच्या माध्यमातून औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीच्या अनेक केसेस दाखवल्या आणि या समसेच्या गांभीर्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन वेळा एक दिवसीय केमिस्ट बंद करण्याचा निर्णय घेऊन देखील कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन सुरूच आहे. तसेच याबाबत कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नासल्याची अनेक उदाहरणे आहेत. थेट ऑनलाईन औषधे घेणे आरोग्याच्या दुष्टीने धोकादायक आहे. ऑनलाईन कंपन्या औषध कायद्याच्या कलम 18 (क) च्या तरतुदींचे उल्लंघन करत उघडपणे जाहिरात करतात.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाला सुरवात झाली. घोषणा देत मोर्चा सिव्हिल हॉस्पिटल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालायपर्यंत गेला. या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)