ऑनलाईन औषध विक्री विरोधात तहसिलदारांना निवेदन

वडूज : नायब तहसीलदार मीना निंबाळकर यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी व औषध विक्रेते.

वडूज, दि. 27 (प्रतिनिधी)- ऑनलाईन औषध विक्रीला केमिस्ट आणि फार्मासिस्टनी विरोध दर्शवला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली. शिवाय आज केमिस्ट आणि फार्मासिस्टनी देशव्यापी संप पुकारण्याचा निर्धार करत वडूज येथे खटाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियनच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकार देशात ऑनलाईन औषध विक्रीला हिरवा कंदील दाखवण्याच्या तयारीत आहे. केंद्राने ऑनलाईन फार्मसीबाबत मसुदा तयार केला असून त्याबाबत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. मात्र, अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने या निर्णयाविरोधात लढा पुकारण्याचा निर्धार केला आहे. तालुक्‍यातील सर्व फार्मासिस्टने काळ्या फिती लावून सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. दि.21 सप्टेंबरपासून शहरातील सर्व औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे. तर दि.28 रोजी याबाबत देशभरातील केमिस्ट आणि फार्मासिस्टनी देशव्यापी संप पुकारला असून यात सहभागी होणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष सतीश साळुंखे, सचिव अतुल इनामदार, खजिनदार महेश पुस्तके, सुधीर शहा, शिरीष शहा, मनोज वेदपाठक, संतोष गोडसे, किरण लंगडे यांच्यासह अनेक औषध विक्रेते उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)