“ऑटोनॉमी”पद्धतीमुळे शिक्षकांना संधी!

डॉ. उमराणी : प्रा. मोरे महाविद्यालयात कार्यक्रम

पिंपरी – आपल्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी उच्च शिक्षण, ज्ञान-विज्ञान-विवेक महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांमध्ये ते निर्माण करण्याचे काम शिक्षकाचे आहे. शिक्षकाने ते आपल्या अंगी बाणवले पाहीजे. गेल्या 30-40 वर्षांत शिक्षणामध्ये मूलगामी प्रयोग झालेले नाहीत. “ऑटोनॉमी’च्या निमित्ताने ही संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये परीक्षा पद्धती, सिलॅबस, अभ्यासाची पद्धत याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असून, मोठी जबाबदारी यामध्ये असणार आहे. वाचन, संशोधन आणि अभ्यास याची गरज वाढणार आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्‍त केले.

आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी डॉ. उमराणी बोलत होते. वाणिज्य विभागातील डॉ. मुकुंद डोंगरे, शास्त्र विभागातील प्रा. बी. एस. जाधव, कला शाखेतील प्रा. एस. एस. काटे यांचा सेवापूर्ती गौरव करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, पद्मश्री विखे पाटील अध्यासनाचे समन्वयक डॉ. मुकुंद तापकीर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निलेष दांगट, डॉ. अभय खंडागळे, उत्सवमूर्ती डॉ. मुकुंद डोंगरे, प्रा. बी. एस. जाधव, प्रा. एस. एस काटे आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.

ऍड. संदीप कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकाची भूमिका सांगितली. शिक्षकांमुळेच महाविद्यालय मोठे होत असते आणि विद्यार्थ्यांना मोठे करण्यातही शिक्षकांचा हात असतो. आपल्या 30-35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून हे प्राध्यापक निवृत्त होत आहेत. तेव्हा यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपली सामाजिक जबाबदारीही सांभाळावी, असेही ऍड. कदम यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने समन्वयक डॉ. पद्मा इंगोले, डॉ. मंजुश्री धुमाळ, प्रा. संतोष जगताप यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)