ऐश्‍वर्याला मिळणार ‘मेरिल स्ट्रीप’ पुरस्कार

सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या “विफ्ट अॅवॉर्ड’च्या समारंभात सहभागी होण्याची संधी ऐश्‍वर्या राय बच्चनला मिळाली आहे. याच समारंभात ऐश्‍वर्याला मेरिल स्ट्रीप पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सिनेक्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

समारंभ हा दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिव्हलद्वारे (डीसीएसएफएफ) आयोजित केला जातो. या समारंभातील पुरस्कार आणि त्यातील कार्यक्रमांची माहिती सहसा प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकत नाही. या समारंभाबाबत खूपच गोपनीयता बाळगली जात असते. कार्यक्रमाचे उच्च मूल्य कायम राखण्यासाठी या समारंभाबाबत सवंग प्रसिद्धीला रोखण्यासाठी आणि विनाकारण गॉसिप फॅक्‍टरीला वाव मिळू नये यासाठीच या समारंभाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“डीसीएसएफएफ’च्या फिल्म फेस्टिव्हलला अमेरिकेच्या सांस्कृतिक कॅलेंडरमध्ये खूपच मानाचे स्थान आहे. त्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये फिचर्स, डोक्‍युमेंटरीज, शॉर्ट फिल्म तर दाखवले जातातच. त्याशिवाय भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या दक्षिण आशियाई देशांमधील नावाजलेले सिनेमेही दाखवले जातात.

“विफ्ट’मधील इंडिया अॅवॉर्ड नाईटमध्ये ऐश्‍वर्याला पुरस्कार दिला जाणार आहे. ऐश्‍वर्याच्या आगोदर एलिझाबेथ टेलर, मेरील स्ट्रीप, निकोल किडमॅन, केट ब्लॅंचट, सॅन्ड्रा बुलक आणि हॉलिवूडमधील आणखी काही अभिनेत्रींनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच समारंभामध्ये झीनत अमानला “लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले होते. फिल्म आणि टेलिव्हिजनमधील महत्त्वाच्या योगदानाबद्दल मेरील स्ट्रीप पुरस्कार दिला जात असतो. ऐश्‍वर्याला हा पुरस्कार मिळणे म्हणजे भारतीय कलाक्षेत्राचाच गौरव आहे.

ऐश्‍वर्याकडे सध्या एक मोठा बायोपिक येण्याची शक्‍यता आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकची तयारी सध्या सुरू असल्याचे समजते आहे. या सिनेमासाठी एक सोडून दक्षिणेतील 3 निर्माते कामाला लागले आहेत. त्यातील आदित्य भारद्वाज यांच्या सिनेमासाठी ऐश्‍वर्या राय आणि अनुष्का शेट्टी या दोघींशी चर्चा झाली आहे. अर्थात जयललिता यांचा रोल कोणाला मिळणार हे निश्‍चित झालेले नाही. या सिनेमामध्ये एम. जी. रामचंद्रन यांच्या रोलसाठी मोहनलाल यांना विचारणा झाल्याचेही समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)