एस. टी.चे चालक-वाहक बनले खाजगी गाडीचे प्रवाशी

वाल्हे- मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अचानक बससेवा बंद केल्यामुळे नागरिकांना जास्त पैसे देउन खाजगी गाड्यांनी प्रवास करावा लागला. कधीही खाजगी गाडीतून प्रवास न करणारे एसटी महामंडळाच्या चालक वाहकांना ही घरी जाण्यासाठी खाजगी गाडीत बसावे लागले.
आंदोलनामुळे अचानक बसेस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज मध्ये जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एसटी चालकांना ही आगारापर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अनेकांनी मित्रांच्या दुचाकीवर आगार गाठले. एसटी महामंडळाचे दुसऱ्या दिवशीच्या गाड्यांचे नियोजनही पूर्णपणे ढासळले आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांनी ही बाहेर जाण्याचे टाळले आहे. अनेक वेळा अफवा पसरत असल्यामुळे पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. ग्रामीण भागागील अनेक विद्यार्थी शहरात शिकत असून एस. टी. तून येणारे डबेही बंदमुळे आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)