एस. टी. चा कायापालट करणार – दिवाकर रावते

पिंपरी – येत्या पाच ते सात वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा (एस. टी.) कायापालट होणार असून आपल्या संकल्पनेतील आगाराची निर्मिती करुन कर्मचाऱ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातील, असे आश्‍वासन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी (दि. 24) दिले.

एस. टी. महामंडळ व रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने पिंपरी-चिंचवड मधील वल्लभनगर एस. टी. आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन रावते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, वल्लभनगर आगार प्रमुख संजय भोसले, रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाकर रावते म्हणाले की, एस. टी. आगारांमधील 250 स्वच्छतागृह उभारणीच्या कामास नुकतीच मान्यता दिली आहे. सुमारे 105 आगारांचे नुतनीकरण केले जात आहे. तर 100 कामांच्या निविदा निघाल्या आहेत. एस. टी. च्या चालक, वाहकांना सोयी-सुविधांबरोबरच मनोरंजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्रांतीगृहाचे उद्‌घाटन झाल्यावर रावते यांनी रोटरी क्‍लबला आणखी काही सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. वल्लभनगर आगारातील विश्रांतीगृहाच्या नुतनीकरणासाठी 19 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यापैकी 60 टक्के खर्च रोटरी क्‍लब व 40 टक्के खर्च एस. टी. प्रशासनाने केला आहे.

तोड म्हटले की तोडतो…
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील शिवसेना व भाजप युतीच्या भवितव्याबाबत दिवाकर रावते यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, शिवसैनिक कोणतीही चर्चा करत नाही. शिवसैनिक फक्त आदेश पाळतो. तोड म्हटले की तोडतो, असे सांगत त्यांनी युतीबाबत अधिक भाष्य टाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)