एसबीआय कार्डची ग्राहकसंख्या वाढली 

नवी दिल्ली – एसबीआय कार्ड कंपनीने कार्डग्राहकांच्या संख्येत आजवरची सगळ्यात वेगवान वाढ नोंदवून ही संख्या 60 लाखांच्या वर नेली आहे. कंपनीने सप्टेंबर 2017 आणि फेब्रुवारी 2018 या 6 महिन्यांच्या काळात 10 लाखांपेक्षा अधिक ग्राहक कमावून बाजारपेठेतला हिस्सा 16%वर नेला आहे. कंपनीने ऑक्‍टोबर 2016 आणि सप्टेंबर 2017 मध्ये 10 लाख ग्राहक जोडून आपल्या कार्डधारकांची संख्या 50 लाखांवर नेली होती. एक वर्षापूर्वी कार्डाद्वारे दरमहा 4000 कोटी रुपये खर्च केले जात होते, तो आकडा वाढून आता 7000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ हरदयाल प्रसाद म्हणाले, गेल्या काही वर्षांत या उद्योगातील वार्षिक वाढीचा दर 25% असताना आम्ही सातत्याने 40% दराने वृद्धी साध्य केली आहे. कार्डांची संख्या आणि कार्डाद्वारे होणारा खर्च या दोन्ही निकषांवर आमचा बाजारपेठेतील हिस्सा स्थिरगतीने वाढला आहे.

भारत वेगाने डिजिटल बनत चाललेला असताना नावीन्यपूर्ण कल्पना आणि वाढीसाठी पोषक संधी आहे, यावर आमचा विश्‍वास आहे. आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम पेमेंट सोल्यूशन्सच्या माध्यमातून ग्राहकांना कार्ड वापरण्याचा समृद्ध अनुभव देण्यासाठी आम्ही नावीन्यपूर्ण गोष्टी घडवत राहू आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करू. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सुप्तशक्तीचा वापर करून घेण्याच्या कल्पनेनेही आम्ही भारले गेले आहोत. एकीकडे भारतातील पेमेंट्‌स परिसंस्थेच्या विकासात योगदान देत असताना आमच्या ग्राहकांसाठी सातत्याने मूल्यनिर्मिती करण्यातून आघाडीची कार्ड जारी करणारी कंपनी हे आमचे स्थान बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)