एसटी लक्ष्य; 16 बसेस खाक

मंचर – आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले तर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर-चाकण येथे हे आंदोलनाचा भडकाच उडाला. यात समाजकंटकांनी एसटीला लक्ष्य करीत सुमारे 16 एसटी बसेस जाळल्या तर 13 बसेसची तोडफोड केल्याने एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती राजगुरूनगर एसटी आगाराच्या प्रभारी व्यवस्थापिका यू. एस. टाकळकर यांने दिली.
समाजकटंकांनी एसटीला लक्ष्य केले. त्यात एसटी बसेस, एशियाड, शिवशाही आणि तिकिट तपासणीची सुमो गाडीचा समावेश आहे. तसेच एकादिवसात सुमारे 823 फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे 8 ते 9 लाख रूपयांचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. नारायणगाव एसटी आगाराच्या 950 एसटीच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे सुमारे 10 ते 11 लाख रूपयांचे एसटी उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)